Posts

Showing posts from July, 2021

लोकमान्य- प्रखर राष्ट्रवादाचा धगधगता निखारा

Image
  आज लोकमान्यांची शतकोत्तर पहिली पुण्यतिथी. आपल्या देशामध्ये राष्ट्रवादाची ज्योत ज्यांनी पेटवली त्या महापुरूषाचं आज पुण्यस्मरण. केवळ महापुरुष म्हणल्याने त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आवाका लक्षात येणं अवघड आहे. देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या महापुरुषाला आज मात्र आपण वाळीत टाकलं आहे हे नक्की. लोकमान्यांसारखा तेजस्वी सुर्य तळपत असताना आपण मात्र इतर मिणमिणत्या दिव्यांना राष्ट्रपुरुष बनवण्यात धन्यता मानली. अर्थात त्याची किंमत देश मोजतोच आहे. लोकमान्यांसारखा द्रष्टा महापुरुष ज्या गोष्टींसाठी आग्रही होता त्या गोष्टींना आजवर आपण तिलांजली दिली. इतिहासाच्या एका सुवर्ण पुत्राला अडगळीत टाकण्याचं काम आजवर ह्या देशानी केलं. लोकमान्यांसारखा धोरणी विचारवंत पुन्हा होईल न होईल.   ब्रिटिशांच्या हुकूमशाहीला संपूर्ण विरोध असलेला राष्ट्रीय पातळीवरचा सर्वोच्च नेता म्हणजे टिळक. लोकमान्यांची ब्रिटीशांना म्हणूनच धास्ती होती. लोकमान्यांचे विचार जनतेला पटत आहेत हे ब्रिटिशांसाठी धोक्याची बाब होती. त्यामुळेच त्यांना वारंवार सक्तीचा कारावास दिला गेला. हयाउलट ब्रिटिशांच्या सोयीच्या महापुरुषांना अर्थात मवाळ ...